गुढी पाडव्यावर करोनाचे संकट

621

करोनाच्या अनुषंगाने राज्यात संचारबंदीचे आदेश लागू केले आहेत. त्यामुळे बाजारपेठ पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. बुधवारी गुढीपाडवा सण असून या उत्सवावरही करोनाचे सावट असून नागरिकांना किराणा माल मिळणेही मुश्किल झाले आहे.

गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर नागरिकांकडून वाहन, सोने, नवीन घरांची खरेदी केली जाते. यंदा मात्र करोनामुळे सर्वकाही ठप्प झाले आहे. करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने गुरूवारपासून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंदी केली आहेत. त्यामुळे गुढीपाडव्याच्या पार्श्‍वभूमीवर सोनेसह इतर खरेदी बंद झाली आहे. दरम्यान, सोमवारपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे पोलिस व जिल्हा प्रशासनाकडून रस्त्यावर फिरण्यास अटकाव केला जात आहे. किराणा दुकाने सुरू असली तरी, सणासाठी किराणा खरेदी करणे नागरिकांना मुश्किल झाले आहे. एसटी बस वाहतूक बंद असल्याने शहरातील तीनही बसस्थानकांवर शुकशुकाट आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचेही शहराकडे येणे बंद झाले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या