उड्डाणपुलाच्या पिलरवर जाहिरात करणाऱ्यावर गुन्हा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अनेक वर्षांच्या प्रतीक्षेत असणाऱ्या उड्डाणपुलाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. हा उड्डाणपूल लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार आहे. या उड्डाणपुलाच्या कामामुळे शहराच्या सौंदर्यकरणात भर पडणार आहे.

उड्डाणपुलांच्या पिलरवर छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनचरित्र रेखाटण्याचे काम सुरू झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आजच्या युवा पिढीला कायमस्वरूपी प्रेरित राहावेत, यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे. मात्र, एकाने चक्क उड्डाणपुलाच्या पिलरवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या रेखाटलेल्या चित्राखाली जाहिरातीचे पोस्टर लावले आहे. मात्र, उड्डाणपूल प्रशासनाने तत्काळ याप्रकरणी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. उड्डाणपुलाच्या पिलरचे विद्रुपीकरण करण्याचे काम केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा उड्डाणपूल प्रशासनाने दिला आहे.

कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये कलम 427 प्रमाणे फिर्यादी राहुल विठ्ठल यांनी फिर्याद दाखल केली आहे. आरोपीने उड्डाणपुलाची रंगोरंगोटी केलेल्या पिलरनंबर 64 वर सिद्धी इन्स्टिटय़ूट ऑफ पॅरामेडिकल वक्रतुंड मार्केटजवळ नगर-पुणे रोड केडगाव, नगर यांच्या जाहिरातीचे छोटे बॅनर चिटकवून रंगरंगोटीच्या कामाचे नुकसान केले आहे.