
सामना प्रतिनिधी। नागपूर
हिंगणारोडवरून आज सकाळी धावणाऱ्या बसने सातच्या सुमारास अचानक पेट घेतला. या आगीत बस संपूर्णपणे जळून खाक झाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीत हानी झालेली नाही.बस पेटल्याचे लक्षात येताच चालकाने सावधगिरी बाळकत सर्व प्रवाशांना खाली उतरवल्याने मोठा अनर्थ टळला.
ही बस मंगळवारी 25 प्रवाशांना घेऊन हिंगण्याकडे निघाली होती. बालाजीनगरजवळ असताना अचानक बसच्या केबिनमधून धूर येताना येऊ लागला. चालकाच्या ही बाब लक्षात येताच त्याने बस रस्त्याच्या कडेला थांबवली. त्यानंतर चालकाने सर्व प्रवाशांना तात्काळ खाली उतरविले. त्यांना दुसऱ्या बसने रवाना करण्यात आले. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी सुरू आहे
































































