
सामना प्रतिनिधी । नांदेड
आगीत होरपळल्याने एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याची घटना मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद गावात घडली. कुडाच्या घराला मध्यरात्री अचानक लागलेल्या आगीत 39 वर्षीय व्यंकट पवार, पत्नी रेखा आणि 8 वर्षाच्या काजल नावाच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. आगीतून करण (वय 12) बालबाल बचावला.



























































