
सामना प्रतिनिधी । नांदेड
नांदेड येथील सचखंड गुरुव्दारा बोर्डाच्या तीन सदस्य पदांसाठी 28 डिसेंबर रोजी झालेल्या निवडणुकीत रविंद्रसिंघ बुंगई, मनप्रितसिंघ कुंजीवाले आणि गुरमितसिंघ महाजन हे तिघे प्राधान्य क्रमाने निवडून आले. या तिघांना सदस्य पदाचे प्रमाणपत्र जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते देण्यात आले. गुरुद्वारा बोर्डाच्या निवडणुकीची मतमोजणी 30 डिसेंबर रोजी बचत भवनमध्ये करण्यात आली. या निवडणुकीसाठी एकूण 26 हजार 169 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तीन सदस्य पदासाठी 26 उमेदवार रिंगणात होते.
निवडून आलेले रविंद्रसिंघ बुंगई यांना सर्वात जास्त म्हणजे 4 हजार 478 मते मिळाली. त्यांच्याखालोखाल मनप्रितसिंघ गोविंदसिंघ कुंजीवाले यांना 4 हजार 246 मते मिळाली. तर निवडून आलेले तिसरे सदस्य गुरमितसिंघ महाजन यांना 3 हजार 374 मते मिळाली. प्राधान्यक्रमाने हे तिघे सदस्यपदी निवडून आले.
इतर उमेदवारांना मिळालेली मते खालीलप्रमाणे –
गुलबिरसिंघ बऱ्यामसिंघ नवाब-3046, रणजितसिंघ खंडासिंघ कामठेकर-2009, तेजपालसिंघ कुलवंतसिंघ खेड-2664, रिशीराजसिंघ जसपालसिंघ ओबेराय-1836, बलजितसिंघ भगवानसिंघ बावरी-1083, परविंदरसिंघ जगजितसिंघ कौशल-534, जोगेंद्रसिंघ बक्षीसिंघ रामगडीया-417, गुरदीपसिंघ कुलदीपसिंघ संधू-305, हरभजनसिंघ करणसिंघ दिगवा-299, हरप्रितसिंघ केशरसिंघ लांगरी-164, हरदिपसिंघ गुरुबक्षसिंघ घडीसाज-116, प्रेमज्योतसिंघ गुरुबचनसिंघ सुखई-97, हरचरणसिंघ गोविंदसिंघ गुलाटी-71, परमजितसिंघ चरणसिंघ पेशकार-68, जगबिरसिंघ अमरसिंघ सोडी-61, जसबिरसिंघ बलबिरसिंघ धुपिया-59, प्रकाशसिंघ कानसा-56, हरप्रितसिंघ जसपालसिंघ बाठ-54, तेजवंतसिंघ संतोषसिंघ रागी-51, अवतारसिंघ जगतसिंघ पहरेदार-51, जसबिरसिंघ प्रेमसिंघ हांडे-47, कर्नलसिंघ काळूसिंघ गाडीवाले-46 आणि सतनामसिंघ हरीसिंघ पुजारी 37.
28 डिसेंबर रोजी नांदेड, संभाजीनगर, बीड, जालना, लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली, चंद्रपूर अशा एवूâण 71 मतदान केंद्रावर मतदान झाले होते. या निवडण्ुाकीत 26 उमेदवार निवडणूक लढवित होते. यासाठी 12 हजार 714 मतदार होते. सर्वाधिक मतदार हे नांदेड जिल्ह्यात 8 हजार 207 तर सर्वात कमी मतदार धाराशिव जिल्ह्यात चार होते. या निवडणुकीत 72.54 मतदान झाले होते. अर्थात 9 हजार 223 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली 29 डिसेंबरपासून या निवडणुकीची मतमोजणी सुरु झाली आणि आज अखेर जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी निकाल जाहीर केला. निकाल जाहीर केल्यानंतर विजयी उमेदवारांनी शहरात जल्लोष साजरा केला.



























































