पाकड्यांच्या गोळीबारात, नाशिकचे सुपुत्र जवान केशव गोसावी शहीद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । जम्मू

पाकिस्तानी सैन्याने सीमेपलीकडून केलेल्या गोळीबारात नाशिकचे सुपुत्र केशव सोमगीर गोसावी हे शहीद झाले. नियंत्रण रेषेवर नौशेरा सेक्टरमध्ये आज रविवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास पाकिस्तानी सैन्याने अंदाधुंद गोळीबार सुरू केला. या गोळीबाराला केशव गोसावी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. दुर्दैवाने शत्रूशी लढताना गोसावी यांना वीरमरण आले. त्यांच्यावर तत्काळ उपचार सुरू करण्यात आले. मात्र मृत्यूशी सुरू असलेली त्यांची झुंज अपयशी ठरली. 29 वर्षांचे शहीद केशव गोसावी हे सिन्नर तालुक्यातील श्रीरामपूर गावचे रहिवाशी होते. त्यांच्या पश्चात पत्नी यशोदा गोसावी आहे.