नाशिकमध्ये सात अकस्मात मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
file photo

शहरात मंगळवारी अस्वस्थ वाटू लागल्याने सात जणांचा मृत्यू झाला. अकस्मात मृत्यूंची दिवसागणिक वाढणारी ही संख्या धडकी भरवणारी आहे.

पंचवटीतील शामराव ढाकणे (72) हे गँगरिन, मधुमेह व उच्च रक्तदाबाने त्रस्त होते. अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना सोमवारी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता मध्यरात्री त्यांचा मृत्यू झाला. म्हसरूळचे राजेश भागवत (37) हे बुधवारी सकाळी काटय़ा मारुती चौकातील पुलाजवळ मृतावस्थेत आढळले. श्वास अडकून त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती पंचवटी पोलिसांनी दिली. श्वास घेण्यास त्रास झाल्याने गुरुद्वारा रोडवरील शरद मंडाले (67), त्रिमूर्ती चौकातील रामदास पवार (73) व सावतानगरचे अशोक सोनार (75) यांचा काल मृत्यू झाला, तर चक्कर येऊन बेशुद्ध पडल्याने सिडकोतील मुरलीधर अवचार (52), जत्रा हॉटेलसमोर एका 45 वर्षीय अनोळखी पुरुषाचा मृत्यू झाला.