
काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी (वय – 75) यांची आज ‘नॅशनल हेराल्ड’शी संबंधित कथित मनी लॉण्डरिंग प्रकरणी अंमलबजावणी संचलनालयाकडून (ईडी) चौकशी करण्यात आली. गुरुवारी दुपारी 12 च्या सुमारास सोनिया गांधी ईडीच्या कार्यालयात हजर झाल्या. साधारण अडीच तास त्यांची चौकशी सुरू होती. सोनिया गांधी यांना घशाचा त्रास होत असल्याने त्यांनी ईडीच्या प्रश्नांची लेखी स्वरुपात उत्तरे दिल्याची माहिती मिळत आहे. आज चौकशीनंतर त्यांना पुन्हा बोलावण्याची शक्यता आहे.
Delhi | Congress interim president Sonia Gandhi leaves from ED office after questioning in the National Herald case. pic.twitter.com/j0iWgoBqsZ
— ANI (@ANI) July 21, 2022
तपास यंत्रणेने सोनिया यांना पहिल्यांदा समन्स बजावताना हजर राहण्यासाठी 8 जूनची तारीख दिली होती. पण कोरोनाची लागण झाल्यामुळे सोनिया गांधी त्या तारखेला ईडीपुढे हजर राहू शकल्या नव्हत्या. त्यानंतर ईडीने त्यांना 23 जूनला हजर राहण्यास सांगून दुसरे समन्स बजावले होते, मात्र डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिल्यामुळे त्या तपास यंत्रणेपुढे हजर राहू शकल्या नाहीत. यादरम्यान त्यांनी ईडीकडे मुदत मागितली होती. त्यांच्या विनंतीनुसार चौकशीला चार आठवड्यांची स्थगिती देत ईडीने सोनिया यांना 21 जुलैला हजर राहण्यास सांगितले होते. त्यानुसार आज त्या ईडी कार्यालयात हजर राहिल्या.
काँग्रेस नेते आक्रमक
सोनिया गांधी यांच्या ईडी चौकशीवरून काँग्रेस नेते आक्रमक झाले आहेत. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. ज्या व्यक्तीने एकदा नव्हे तर दोनदा पंतप्रधानपद नाकारल्या त्या व्यक्तीवर 90 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप होतोय, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. तर गुलाम नबी आझाद यांनी एकाच कुटुंबातील दोन सदस्यांना एकाच प्रकरणात पुन्हा-पुन्हा चौकशीला बोलावणे चुकीचे असल्याचे म्हटले.
The same person who declined Prime Ministership, not once but twice, has been accused of involvement in a Rs 90 crore scam: Chhattisgarh CM Bhupesh Baghel pic.twitter.com/L0zg8yEawi
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) July 21, 2022
देशभरात निदर्शने
सोनिया गांधी यांनी ईडीचे समन्स आल्यानंतरच काँग्रेसने देशभरात आंदोलन करण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार आज देशभरात ठिकठिकाणी काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. अनेक ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. तर दिल्लीमध्ये आंदोलन करणारे काँग्रेस नेते पी. चिदंबरम, अजय माकन आणि इतर नेत्यांना यावेळी पोलिसांनी ताब्यात घेतले.
Delhi | Congress leaders P Chidambaram, Ajay Maken and others detained in the wake of nationwide protest called by the party over ED probe against Sonia Gandhi pic.twitter.com/g8xx013aMf
— ANI (@ANI) July 21, 2022
बंगळुरुत सहा जणांना अट
बंगळुरूमध्ये युवा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पुकारलेले आंदोलन हिंसक झाले. या दरम्यान एका कारला आग लावण्यात आल्याने पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे.
Delhi | Water cannons being used at Congress workers protesting over ED probe against party chief Sonia Gandhi in National Herald case pic.twitter.com/rct7KZYAc3
— ANI (@ANI) July 21, 2022


























































