
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर नुकतीच ब्रीच कँडी रुग्णालयात पित्ताशयावरील शस्त्रक्रिया पार पडली. शस्त्रक्रीयेनंतर आता त्यांची प्रकृती सुधारली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
Maharashtra: NCP chief Sharad Pawar, who underwent gall bladder surgery at the Breach Candy Hospital in Mumbai, discharged from facility, says party spokesperson
— Press Trust of India (@PTI_News) April 15, 2021
पोटदुखीच्या तक्रारीनंतर मागील महिन्यात पवार यांना ब्रीच कॅंडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पित्ताशयातील खडा हे त्यांच्या पोटदुखीचे कारण असल्याचे तपासणीनंतर समोर आले होते. डॉक्टरांनी त्यांना शस्त्रक्रियेचा सल्ला दिला होता. 30 मार्च रोजी रात्री शरद पवार यांच्यावर एण्डोस्कोपी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर 3 एप्रिलला त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले होते. सोमवारी त्यांच्यावर दुसरी शस्त्रक्रीया करण्यात आली होती.




























































