
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या राजकीय हालचालींमुळे राज्याच्या राजकारणात गोंधळ उडाला आहे. अजित पवार नक्की कोणती भूमिका घेणार, ते भाजपसोबत जाणार की महाविकास आघाडीसोबतच राहणार अशा चर्चा सुरू आहेत. यासंदर्भात अजित पवार यांनी मी माझं काम करतो आहे असं स्पष्ट केल्यानंतर देखील चर्चा सुरूच आहेत. त्यानंतर आता अजित पवार पत्रकार परिषद घेऊन काय भूमिका मांडणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.































































