नादच केला थेट! नरहरी झिरवळांनी पत्नीला खांद्यावर घेत धरला ठेका, व्हिडीओ व्हायरल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ आपल्या साधेपणामुळे चर्चेत असतात. पायजमा, सदरा आणि टोपी असा त्यांचा मराठमोळा पेहराव असतो. बोलण्याची त्यांची खास शैली असून यामुळेही ते चर्चेत असतात. मात्र आता ते एका वेगळ्या कारणाने चर्चेत आले आहेत. सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून यात ते पत्नीला खांद्यावर घेऊन नाचताना दिसत आहेत.

नरहरी झिरवळ यांनी पत्नीला खांद्यावर घेत डान्स केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. संभळ या पारंपरिक वाद्याच्या आवाजावर त्यांनी ठेका धरला आहे. तसेच हे वाद्यही त्यांनी वाजवले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

मराठमोळा पेहराव

नरहरी झिरवळ हे काही दिवसांपूर्वी पत्नीसह जपान दौऱ्यावर गेले होते. तेव्हा पांढरा सदरा, धोतर, डोक्यावर गांधी टोपी, पायात चपला अशा पेहरावात ते होते. तर पत्नी नऊवारी साडी, कपाळाला कुंकू, गळ्यात पोत घालून होत्या. विदेशात जाऊनही संस्कृती जपणाऱ्या झिरवळ दाम्पत्याच्या जपानमधल्या या फोटोंवर अनेक नेत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला होता.