राष्ट्रवादीचा वीजचोर युवाध्यक्ष गजाआड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो प्रातिनिधीक

सामना प्रतिनिधी, भिवंडी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या न्यू कणेरी येथील कार्यालयात चोरून वीज घेतल्याप्रकरणी शहर पोलिसांनी राष्ट्रवादीचा युवाध्यक्ष हारुन अबुलजैस खान याला अटक केली आहे. खान याला ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता त्याला 14 दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

भिवंडी शहराला वीजपुरवठा करणाऱ्या टोरंट पॉकर लिमिटेड या कंपनीविरोधात अबुलजैस खान आणि राष्ट्रवादीने गेल्या महिनाभरापूर्वी मोठे आंदोलन छेडले होते. मात्र वीज कंपनीच्या विरोधात आंदोलन छेडणारा पदाधिकारीच वीजचोर निघाल्यामुळे शहरातील राजकीय वर्तुळात जोरदार खळबळ उडाली आहे. वीज कंपनीच्या दक्षता पथकाने ही वीजचोरी उघडकीस आणली असून याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र फड अधिक तपास करत आहेत.