NEET परीक्षार्थी महिला उमेदवारांना विशेष सवलत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

येत्या रविवारी 17 जुलै रोजी होणाऱ्या राष्ट्रीय पात्रता व प्रवेश चाचणी (NEET) परीक्षेला बसणाऱ्या महीला उमेदवारांना ओयो होटेल निवासासाठी ६० टक्के सवलत देण्यात येणार आहे.

येत्या रविवार, 17 जुलै रोजी देशातील विविध 497 शहरांमधील केंद्रांमध्ये होणार असून या परीक्षेला 18 लाखांहून जास्त उमेदवार बसण्याची शक्यता आहे. त्यामधील अर्ध्या महिला उमेदवार असून त्यांना ओयो हॉटेलमधील निवासासाठी 60% पर्यंत सवलत देण्यात येणार आहे. ही सवलत योजना दोन दिवसांसाठी म्हणजे 16 जुलै ते 17 जुलै रोजी उपलब्ध असेल.

ही सवलत मिळवण्यासाठी OYO app डाउनलोड करून आपल्या परीक्षा केंद्राच्या जवळचे टायअप केलेले हॉटेल शोधण्यासाठी लाल ‘नीअरबाय’ आयकॉनवर क्लिक करावे लागेल. कूपन कोड ‘NEETIF’ सिलेक्ट करा आणि ‘बूक नाउ अँड पे एट द हॉटेल’ बटनावर प्रेस करा. सर्व सहभागी असलेल्या हॉटेल्समध्ये परीक्षार्थींना वायफाय आणि एअर कंडीशनिंग सुविधा असेल.