…म्हणून ऑक्सिजनची मागणी वाढतेय!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत गेल्या वर्षी मार्चमध्ये शिरकाव केलेल्या कोरोनाची ताप, सर्दी, खोकला, श्वसनाला त्रास अशी लक्षणे तीव्र स्वरूपात दिसत होती. मात्र आता कोरोनाची स्ट्रेन बदलली असून 80 टक्क्यांहून जास्त रुग्णांमध्ये लक्षणेच दिसत नाहीत. त्यामुळे लागण झालेले रुग्ण कुटुंबासोबत राहत असल्याने संपूर्ण कुटुंब बाधित होण्याचे प्रमाण वाढले आहे.

यामध्ये चाचणी करण्यासही विलंब होत असल्याने फुप्फुसात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढल्याने शरीराला आवश्यक प्रमाणात ऑक्सिजन मिळत नाही. त्यामुळे ऑक्सिजन पातळी कमी होणारे रुग्ण वाढत असल्याचे पालिकेच्या वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालयांचे संचालक डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले.

सुरुवातीला सुप्त स्वरूपात असणारा कोरोना आठवडय़ानंतर तीव्र लक्षणे दाखवण्यास सुरुवात होते. ‘इंफ्लोमेट्रिक फायब्रोसीस ऑफ लंग’ झाल्याने शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा कमी प्रमाणात होतो. ‘एचआरसीटी’ स्कोअर वाढत जातो. यामध्ये सहव्याधी, ज्येष्ठांना धोका अधिक असतो. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह नसलात तरी प्रत्येकाने खबरदारी घेतलीच पाहिजे, वेळीच चाचणी केली पाहिजे, असे आवाहनही डॉ. भारमल यांनी केले.

‘त्रिसूत्री’चा अवलंब करा!

खबरदारी आणि लसीकरण हेच कोरोना रोखण्याचे सद्यस्थितीत महत्त्वाचे उपाय आहेत. लसीकरण टप्प्याटप्प्याने होत आहे. त्यामुळे आता कोरोनाला हरवण्यासाठी ‘मास्क वापरा, हात धुवा, सुरक्षित अंतर’ या त्रिसूत्री उपायांना पर्याय नसल्याचे डॉ. भारमल यांनी सांगितले.

रेमडेसिवीर फक्त विषाणूची वाढ रोखते!

रेमडेसिविर मृत्यू रोखू शकत नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेनेही स्पष्ट केले आहे. रेमडेसिवीर फक्त कोविड विषाणूचे मल्टिफिकेशन थांबवते. आयसीयू, व्हेंटिलेटरवरचा कालावधी कमी करते. परिणामी रुग्ण बरे होण्याचा कालावधी कमी होतो. मात्र रुग्ण-नातेवाईक रेमडेसिवीर मिळवण्यासाठी सद्यस्थितीत रुग्ण-नातेवाईक नाहक धावपळ करीत असल्याचे डॉ. भारमल म्हणाले.