कृषी कायदे व इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचे आज राज्यभर उपोषण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
congress

केंद्रातील मोदी सरकारने लोकशाहीला पायदळी तुडवत बहुमताच्या जोरावर मंजूर करवून घेतलेले कृषी कायदे व अन्यायकारक इंधन दरवाढी विरोधात शेतकरी संघटनांनी उद्या 26 मार्च रोजी ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. या बंदला काँग्रेसने सक्रिय पाठिंबा जाहीर केला असून राज्यातील काँग्रेसचे नेते व मंत्री आज मंत्रालयासमोरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत उपोषण करणार आहेत.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांच्यासह अन्य नेते व मंत्री मंत्रालयासमोरील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर उपोषणाला बसणार आहेत. त्याचप्रमाणे राज्यातील सर्व जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणीही काँग्रेस नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपोषणात सहभागी होणार आहेत. प्रदेश कार्याध्यक्ष हे विभागाच्या मुख्यालयात उपोषणाला बसणार आहेत. संभाजीनगर येथे शिवाजीराव मोघे, ठाणे येथे माजी मंत्री नसीम खान, नागपूर येथे चंद्रकांत हांडोरे, पुणे यथे बस्वराज पाटील, नाशिकमध्ये आमदार प्रणीती शिंदे तर अमरावतीत आमदार कुणाल पाटील हे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह उपोषणाला बसणार आहेत.