जगभरातून महत्त्वाच्या बातम्या

बिग बींचा ‘कल्की’ लूक कडक

‘कल्की 2898 एडी’ या आगामी चित्रपटातील अमिताभ बच्चन यांचा टीझरमधून कडक लूक समोर आला आहे. अमिताभ ‘कल्की’मध्ये अश्वत्थामाची भूमिका साकारत आहेत. टीझरमधील बिग बी शिवलिंगाची पूजा करत आहेत. तेवढय़ात एक मुलगा त्यांच्याकडे येतो आणि म्हणतो, ‘‘हाय…मी राया आहे.’’ यानंतर तो मुलगा अश्वत्थामासोबत बोलू लागतो.

बर्फात 4 तास उभे राहण्याचा विक्रम

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवण्यासाठी पोलंडमधील लुकाझ स्पनर नावाच्या एका 53 वर्षीय व्यक्तीने चक्क 4 तास 2 मिनिटे बर्फाच्या पेटीत उभे राहण्याचा विक्रम केला आहे. लुकाझ स्पनर यांना बर्फाच्या पेटीत उभा राहण्याचा विक्रम मोडण्यासाठी आपले तोंड व मानेचा काही भाग वगळता सर्व शरीर बर्फाखाली ठेवण्याची मुभा देण्यात आली होती. त्यात त्यांना केवळ स्विमिंग ट्रक परिधान करण्याची व बर्फामुळे दातखीळ बसू नये म्हणून एक माऊथगार्ड वापरण्याची परवानगी देण्यात आली होती. सुरुवातीचा काही वेळ लुकाझसाठी त्रासदायक ठरला. पण त्यानंतर त्यांनी गिनीज बुकात विक्रम नोंदवला.

राखी सावंतला सर्वोच्च न्यायालयाचा झटका

राखी सावंतला सर्वोच्च न्यायालयाने जोरदार झटका दिला. न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला असून पुढील चार आठवडयात कोर्टात आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले. राखीवर तिचा आधीचा पती आदिल दुर्रानीने खासगी-अश्लिल व्हिडीओ लीक केल्याचा आरोप केला होता. याशिवाय, अनेक मुलाखतीत सुद्धा राखीने आदिल आणि तिच्या खासगी आयुष्यातील अनेक खुलासे केले होते. आदिल दुर्रानीच्या तक्रारीनंतर हे प्रकरण मुंबई हायकोर्टात सुरू होते. परंतु, राखीने सुप्रीम कोर्टात आव्हान देत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.

फेक बँकिंग अॅपचा ट्रप… सावध राहा!

सध्या अनेक प्रकारचे फेक बँकिंग अॅप्स आणि ट्रेडिंग अॅप्स मार्पेटमध्ये उपलब्ध आहेत. या फेक अॅप्समुळे अनेकांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. अनेक फ्रॉड होत आहेत. याप्रकारच्या सायबर फ्रॉडला रोखण्यासाठी पेंद्र सरकारने एक अलर्ट जारी केला आहे. गृह मंत्रालयद्वारा संचालित सायबर सुरक्षा आणि सायबर सुरक्षा जागरूकता हँडल सायबरवरून देण्यात आली. सरकारने अँड्रॉईड स्मार्टपह्न युजर्सना युनियन बँकेच्या फेक अॅपबाबत अलर्ट जारी केला आहे. युनियन-रिवार्डस् एपीके नावाचे हे फेक अॅप आहे. हे अॅप हुबेहुब युनियन बँकेच्या अधिकृत अॅपची कॉपी केली आहे. या फेक अॅपमध्ये युजर्सला बक्षीस देण्याचा दावा केला जात आहे, असे अलर्टमध्ये म्हटले आहे. तसेच अनेक फेक ट्रेडिंग अॅप्ससुद्धा आहेत. याद्वारे फ्रॉड केले जात आहेत. देशभरातील नागरिकांना या अॅप्सद्वारे लाखो रुपयांचा चुना लावला जात आहे.

डबल एमए, पीएचडी महिला चहा विकतेय!

डबल एमए आणि पीएचडीपर्यंत शिक्षण पूर्ण केले असूनही 55 वर्षे महिला रस्त्यावर चहा विकतेय. या महिलेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर महिलेने सांगितले, माझे शिक्षण डबल एमए, पीचडी झाले आहे. 36 वर्षांचा मला कामाचा अनुभव आहे. मी एनजीओमध्येसुद्धा काम केले आहे. वयामुळे मला आता नोकरी मिळणार नाही. त्यामुळे मी सेवा करते. कोरोनाच्या काळात मी खूप सेवा केली. काही लोकांना मी माझ्या घरीसुद्धा ठेवले. बेघर महिलांना सहकार्य केले. त्यामुळे मी आता चहा विकायला सुरुवात केली, असे या महिलेने सांगितले.