अमित शहांच्या सभेचा फज्जा; गाजावाजा करूनही रत्नागिरीत खुर्च्या रिकाम्याच

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीने आज केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या जाहीर सभेचा गाजावाजा केला होता. मात्र सभेला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळे महायुतीची डोकेदुखी वाढली आहे. महायुतीची सभा सुरू झाली तरी मंडपातील अनेक खुर्च्या रिकाम्या होत्या. या रिकाम्या खुर्च्या भरणे महायुतीपुढे एक आव्हान ठरले होते.

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या जवाहर मैदानावर दुपारी महायुतीच्या सभेला सुरुवात झाली. दुपारी तीन वाजता भाजपच्या महिला अध्यक्षा चित्रा वाघ भाषण करत असताना अनेक खुर्च्या रिकाम्या होत्या. त्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी भाषण केले. त्यांचे भाषण सुरू असतानाच पेंद्रीय मंत्री अमित शहा यांचे आगमन झाले. अमित शहा व्यासपीठावर आले तरी अनेक खुर्च्या रिकाम्याच होत्या. मंडपात तीन भाग होते. मधल्या भागातील सर्व खुर्च्या भरल्या होत्या. मात्र एका कोपऱयामध्ये काही खुर्च्या रिकाम्या होत्या.