मोदींनी देशातील जवानांना मजूर बनवले

मोदी सरकारने हिंदुस्थानी सैन्यातील जवानांना मजूर बनवले आहे. अग्निवीरसारख्या योजना आणून दोन प्रकारचे जवान तयार केले, अशा शब्दांत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर घणाघात केला.

देशात आता दोन प्रकारचे शहीद असतील. एकाच्या कुटुंबांना पेन्शन मिळेल त्यांना शहीद म्हणून दर्जाही मिळेल, परंतु अग्निवीर योजनेअंतर्गत गरीब घरातील मुलांना काहीच मिळणार नाही, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. इंडिया आघाडीचे सरकार येईल तेव्हा सर्वात आधी अग्निवीर योजना कचऱयाच्या डब्यात फेकून दिली जाईल, असे आश्वासन राहुल गांधी यांनी दिले. महेंद्रगढ येथील प्रचारसभेत ते बोलत होते. दरम्यान, भारत जोडो यात्रेत महागाई, बेरोजगारीवर अनेकजण बोलले,  परंतु, मोदी सरकारला महागाई आणि बेरोजगारीशी काहीही देणेघेणे नाही, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

 

सर्वांना समान सुविधा मिळतील

इंडिया आघाडीचे सरकार येईल तेव्हा सर्वांना समान सुविधा मिळतील, असे आश्वासन राहुल गांधी यांनी दिले. सैन्यात कुणासोबतही भेदभाव केला जाणार नाही, एकाच प्रकारचे शहीद असतील, एक प्रकारच्या सेवाशर्ती लागू होतील, सर्वांच्या कुटुंबांना पेन्शन मिळेल, शहीदाचा दर्जा सर्वांना मिळेल, असे राहुल गांधी म्हणाले.