बलात्काराच्या आरोपातून मुक्तता; तरीही संदीप लामिछाने टी-20 वर्ल्ड कपला मुकणार!

नेपाळ क्रिकेट संघाचा आघाडीचा फिरकी गोलंदाज संदीप लामिछाने याची नुकतीच बलात्काराच्या आरोपातून मुक्तता झाली होती. मात्र अमेरिकेसाठीचा व्हिसा नाकारल्याने तो यंदाच्या टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपला मुकणार असल्याने नेपाळ संघाला मोठा धक्का बसलाय. संदीप लामिछाने याने स्वतः सोशल मीडियावरून ही माहिती दिली.

न्यायालयाने लामिछाची बलात्काराच्या आरोपातून मुक्तता केल्यानंतर नेपाळ क्रिकेट बोर्डाने त्याचा लगेच टी-20 वर्ल्ड कपसाठी संघात समावेश केला. मात्र न्यायालयाने निर्दोष ठरविले असले तरी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचीही (आयसीसी) क्लीन चिट महत्त्वाची असते. जे क्रिकेटपटू तुरुंगात गेलेले असताना त्यांना आयसीसीकडून क्लिअरन्स मिळाल्याशिवाय राष्ट्रीय संघात समावेश करता येत नाही. त्यामुळे टी-20 वर्ल्ड कपसारख्या मोठय़ा स्पर्धेत खेळण्याचे संदीय लामिछानेचे स्वप्न अखेर भंगले.