एमडीएच, एव्हरेस्टला ‘एफएसएसएआय’ची क्लीन चिट

mdh-everest-indian-spices

 

एफएसएसएआय अर्थात भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने एमडीएच आणि एव्हरेस्ट पंपन्यांच्या मसाल्यांना क्लीन चिट दिली आहे. या मसाल्यांमध्ये इथिलीन ऑक्साईड नसल्याचे तपासणीनंतर एफएसएसएआयने म्हटले आहे. इथिलीन ऑक्साईडपासून कर्करोगाचा धोका असतो. एमडीएच आणि एव्हरेस्टच्या काही मसाल्यांमध्ये इथिलीन ऑक्साईडचे प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त असल्याचा दावा एप्रिल महिन्यात सिंगापूर आणि हाँगकाँगमध्ये करण्यात आला होता. या वादानंतर एफएसएसएआयने 22 एप्रिल रोजी देशव्यापी तपासणी मोहीम सुरू केली. तपासणीत महाराष्ट्र आणि गुजरातमधील एव्हरेस्टच्या उत्पादन युनिटमधील 9 नमुने आणि दिल्ली, हरियाणा आणि राजस्थानमधील एमडीएचच्या उत्पादन युनिटमधील 25 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. 28 मान्यताप्राप्त प्रयोगशाळांमध्ये नमुने तपासण्यात आले, मात्र इतर सहा प्रयोगशाळांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. देशभरातून इतर ब्रँडच्या मसाल्यांचे 300 हून अधिक नमुने गोळा करण्यात आले. इथिलीन ऑक्साईड यापैकी कोणत्याही पदार्थात नव्हते.