अदानींच्या कोळसा घोटाळा चौकशीसाठी जेपीसी नेमणार -काँग्रेस

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रिय मित्र गौतम अदानी यांनी देशातील सर्वात मोठा कोळसा घोटाळा केला. या मेगा मोदानी घोटाळ्यातील उघड भ्रष्टाचारावर ईडी, सीबीआय आणि आयटीला शांत ठेवण्यासाठी किती टेम्पो लागले, असा सवाल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारला केला आहे. तसेच या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी इंडिया आघाडीचे सरकार सत्तेवर येताच संयुक्त संसदीय समिती नेमण्यात येईल असे काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी म्हटले आहे.

अदानी समूहाने तामीळनाडू जनरेशन अँड डिस्ट्रीब्युशन पंपनी या सरकारी मालकीच्या वीज वितरण पंपनीसोबत केलेल्या व्यवहारात कमी दर्जाच्या कोळशाची किंमत वाढवून लावण्यात आली. हा कोळसा तीनपट किंमतीत विकला आणि देशाचे हजारो कोटी लुटले. याची किंमत सर्वसामान्य जनतेने विजेचे भरमसाट बिल भरून मोजावी लागली. 4 जूननंतर इंडिया आघाडीचे सरकार या महाघोटाळ्याची चौकशी करून जनतेकडून लुटलेला प्रत्येक पैशाचा हिशेब घेईल असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.