तिसरी ते बारावीसाठीचा अभ्यासक्रम बदलणार; राज्य अभ्यासक्रम आराखडय़ाचा मसुदा नागरिकांसाठी खुला

तिसरी ते बारावीच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात येणार असून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने राज्य अभ्यासक्रम आराखडा मसुदा तयार केला आहे. हा मसुदा उद्या 23 मेपासून नागरिकांसाठी जाहीर करण्यात येणार आहे. परिषदेच्या http://www.maa.ac.in/ या वेबसाईटवर मसुदा उपलब्ध होणार आहे.

राज्य अभ्यासक्रम आराखडय़ाच्या मसुद्यावर सर्व समाजघटक, शिक्षक, पालक आणि शिक्षणतज्ञ, शैक्षणिक प्रशासन आपले अभिप्राय पाठवू शकतात. त्यासाठी 3 जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. अभिप्राय नोंदविताना आपले नाव, मोबाईल क्रमांक, ईमेल, पत्ता, कार्यालय, जिल्हा आदी तपशील देणे आवश्यक आहे. तसेच अभिप्राय आणि सूचना सकारण नोंदविण्यात याव्यात. क्षेत्र, विषय, पृष्ठ क्रमांक, मूळ मसुद्यातील तपशील, आवश्यक बदल, बदलाचे कारण, कोणत्या मुद्यात दुरुस्ती आवश्यक वाटते याचा तपशील द्यावा, असे  राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार यांनी म्हटले आहे.

अभिप्राय नोंदविण्यासाठी लिंक –
http://forms.gle/TDHL9z8harzRgJoy5

पोस्टाने अभिप्राय पाठविणार असल्यास त्यावर राज्य अभ्यासक्रम आराखडा (शालेय शिक्षण) – 2023 बाबत अभिप्राय (अभ्यासक्रम विकसन विभागासाठी) असे नमूद करावे.