जलतरणपटू रेवा परबची उल्लेखनीय कामगिरी, थायलंड येथील ओशन मॅन स्पर्धेत पटकावले रौप्य पदक

नवी मुंबईत राहणाऱया 12 वर्षीय जलतरणपटू रेवा परब हिने क्राबी थायलंड येथे नुकत्याच आयोजित ‘ओशन मॅन’ क्राबी सी आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेमध्ये खुल्या गटात उत्कृष्ट कामगिरी केली. दोन किलोमीटर अंतर तिने अवघ्या 34 मिनिटे आणि 45 सेपंदांत पार करून रौप्य पदक पटकावले. याबद्दल तिने सर्व स्तरातून काwतुक होत आहे.

‘ओशन मॅन’ या संस्थेने निवडलेला क्राबीचा समुद्र पट्टा हा जलतरणपटूंसाठी सर्वात कठीण पट्टा आहे. याचे कारण म्हणजे या पट्टय़ामध्ये पाण्याचा खूप जोरदार दाब, मोठय़ा लाटा आणि जेलीफिशची असलेली संख्या या सर्व गोष्टींमुळे जलतरणपटूंसमोर खूप मोठे आवाहन होते. या सर्व अडचणी व वेळेचे बंधन यावर मात करून रेवा हिने दुसरा क्रमांक पटकावला.

रेवा ही वाशी येथील फादर अॅग्नल मल्टी पर्पज स्कूलमध्ये इयत्ता सहावीत शिक्षण घेते. यापूर्वी तिच्या नावे अनेक पुरस्कारांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रातील खुल्या गटाच्या जलतरणपटूंमध्ये तिचा नावलौकिक आहे. रेवा हिने वयाच्या नवव्या वर्षी एलिफंटा ते गेट वे ऑफ इंडिया हे 14 किलोमीटरचे अंतर अवघ्या 2 तास 44 मिनिटांमध्ये पार केले होते तसेच वयाच्या अकराव्या वर्षी मांडवा जेट्टी ते गेट वे ऑफ इंडिया हे 20 किलोमीटरचे अंतर अवघ्या चार तास तीन मिनिटांमध्ये पार केले होते.