हेमंत सोरेन यांनी जामीन याचिका घेतली मागे

झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी जामीन याचिका मागे घेतली आहे. हेमंत सोरेन हे सध्या तुरुंगात असून त्यांना न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकांबद्दल काहीच माहिती नाही, असे सांगत सोरेन यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी याचिका मागे घेतली. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामिनाचा हवाला देत सोरेन यांनी आपल्यालाही लोकसभा निवडणूक प्रचारासाठी जामीन देण्याची मागणी हेमंत सोरेन यांनी केली होती. दरम्यान, याचिकेतील फॅक्टस् लपवू नका, ईडीने याप्रकरणी आधीच आरोपपत्र दाखल केले असून त्याची दखल न्यायालयाने घेतली आहे, असेही सर्वोच्च न्यायालयाचे खंडपीठ म्हणाले.