दारूबंदी लोकसभा मतदारसंघापुरतीच; संपूर्ण रायगड जिह्यात ड्राय डे रद्द

लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी संपूर्ण रायगड जिह्यात जाहीर करण्यात आलेली दारूबंदी उच्च न्यायालयाने रद्द केली. केवळ लोकसभा मतदारसंघ मतदानापुरताच ड्राय डे राहील, असे न्यायालयाने स्पष्ट केले. रायगड लोकसभेसाठी 7 मे 2024 रोजी तर मावळ लोकसभेसाठी 13 मे रोजी मतदान आहे.

या प्रकरणी नवी मुंबई हॉटेल ओनर्स असोसिएशनने अॅड. सुजय गावडे यांच्यामार्फत याचिका दाखल केली होती. ही याचिका न्या. अतुल चांदूरकर व न्या. जितेंद्र जैन यांच्या खंडपीठाने मंजूर केली. रायगड जिल्हाधिकारी यांनी जारी केलेल्या ड्राय डेच्या आदेशात न्यायालयाने बदल केले.

 येथे असणार ड्राय डे

z रायगड लोकसभेसाठी 7 मे 2024ला मतदान आहे. 5 मे सायंकाळी 5 वाजल्यापासून मतदान संपेपर्यंत येथे दारूबंदी असेल. z मावळ लोकसभेसाठी 13 मे 2024 रोजी मतदान आहे. तेथे 11 मे सायंकाळी पाच वाजल्यापासून मतदान संपेपर्यंत ड्राय डे असेल. z 4 जून 2024 रोजी निकाल जाहीर होईपर्यंत ड्राय डे असेल, असेही न्यायालयाने नमूद केले.