
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
नीरव मोदी याच्याकडे सहा पासपोर्ट असल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा केंद्र सरकार विचार करीत आहे. एका पासपोर्टवर नीरवचे पूर्ण नाव आहे तर दुसऱ्यावर त्याचे फक्त पहिले नाव आहे. याच पासपोर्टवर त्याला ब्रिटनचा ४० आठवड्यांचा व्हिसा मिळालेला आहे. त्यामुळेच त्याचा पासपोर्ट रद्द होऊनही तो परदेश वाऱ्या करीत असावा, असे तपास यंत्रणांच्या सूत्रांनी म्हटले आहे.
























































