‘निर्भया’ पथकाच्या सक्षमीकरणासाठी 31 कोटींचा निधी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील महिलांना सुरक्षा कवच देण्यासाठी सुरू केलेल्या ‘निर्भया’ पथकाला राज्याच्या गृह विभागाने 31 कोटी 87 लाख रुपयांचे आर्थिक बळ दिले आहे. या निधीतून ‘निर्भया’ पथकासाठी इमर्जन्सी रिस्पॉन्स व्हेईकल, पब्लिक अॅड्रेस सिस्टम व अत्याधुनिक आयटी उपकरणाच्या खरेदीसाठी हा निधी वितरित करण्यात आला आहे. मुंबई शहर महिला सुरक्षितता पुढाकार योजना या पेंद्र व राज्य सरकार पुरस्कृत योजनेला जानेवारी 2019 रोजी मान्यता देण्यात आली आहे. या योजनेस पेंद्र सरकारने 252 कोटी रुपये इतक्या निधीस मान्यता दिली आहे. या योजनेच्या निधीमध्ये पेंद्र सरकारचा 60 टक्के तर राज्य सरकारचा 40 टक्के वाटा आहे. या योजनेअंतर्गत यंत्रसामग्री व साधनसामग्रीच्या खरेदीसाठी मे 2021 रोजी 147 कोटी 48 लाख रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यताही दिली आहे.

‘निर्भया’ फिल्मला प्रतिसाद

‘निर्भया’ पथकाबाबत जनजागृती करण्यासाठी मुंबई पोलिसांनी फिल्म तयार केली आहे. बसमधून प्रवास करणाऱ्या महिलेची छेडछाड करणाऱ्या गुंडाला ‘निर्भया’ पथक कसे ताब्यात घेते, एकटा प्रवास करणाऱ्या महिलेला छेडणाऱ्याला ‘निर्भया’ पथकातील महिला अधिकारी कसा धडा शिकवतात, चौपाटीवर संध्याकाळी फिरणाऱ्या तरुणींना त्रास देणाऱ्यांना ‘निर्भया’ पथक कशा प्रकारे धडा शिकवते याचा संदेश या फिल्ममधून दिला आहे. महिला वर्गातून या फिल्मला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे.

‘निर्भया’ पथक कशासाठी

महिलांवरील अत्याचार लैंगिक छळ, छेडछाड, गुह्यांवर नियंत्रण आणि गुन्हेगारांची मानसिकता बदलण्यासाठी प्रामुख्याने या पथकाची स्थापना केले आहे. तेलंगणा राज्यातील पोलिसांनी महिलांच्या सुरक्षिततेसाठी ‘शी टीम’ नावाचे पथक स्थापन केले आहे.

आता 91 पोलीस ठाण्यांमध्ये पथके

मुंबईतील 91 पोलीस ठाण्यांमध्ये ‘निर्भया’ पथके स्थापन करण्यात आली आहेत. या योजनेची जागृती व सर्वसामान्य महिलांना माहिती देण्यासाठी ‘निर्भया फेसबुक’, ‘निर्भया पुस्तिका’ प्रकाशित करण्यात आली आहे. 103 हा हेल्पलाइन नंबर डायल केल्यावर ‘निर्भया’ पथकाची मदत महिलांना तत्काळ मिळेल. यासह या पथकातील पोलिसांना डेटा सुविधांसह आधुनिक मोबाईल पह्नही दिले आहेत. आधुनिक संपर्क यंत्रणा या पथकाला दिल्यामुळे अडचणीत सापडलेल्या महिलेला त्वरित मदत मिळण्यास मदत होणार आहे.