एलएलबी प्रवेशासाठी वयाचे बंधन नको! 77 वर्षीय आजीबाईची सुप्रीम कोर्टात धाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
supreme_court_295

वयाच्या अटीमुळे एलएलबीला प्रवेश घेऊ शकत नसलेल्या उत्तर प्रदेशच्या 77 वर्षीय आजीबाईने सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठाकले आहे. मला शिकायचेय, राज्यघटनेच्या उपच्छेद 21 अन्वये माझा हा मूलभूत हक्क आहे. या हक्काने मला एलएलबी प्रवेश देण्यात यावा, असा दावा याचिकाकर्त्या राजकुमारी त्यागी यांनी केला आहे. त्यांनी बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या  नवीन नियमावलीला आव्हान दिले आहे.

बीसीआयच्या नवीन नियमावलीनुसार, एलएलबीच्या 5 वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी कमाल 20 वर्षे तसेच 3 वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी कमाल 30 वर्षे वयाची अट आहे. या मर्यादेमुळे एलएलबी प्रवेश मिळत नसल्याने त्यागी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दिवंगत पतीच्या संपत्तीचे रक्षण करण्यासाठी मी एकटीच उरली आहे. वकिलाची मदत घेऊ शकत नसल्याने मृत्यूपत्र तसेच इतर कागदपत्रे हाताळणे कठी झाले आहे. याच पार्श्वभूमीवर मला एलएलबी शिक्षण घेण्याची इच्छा आहे, असे म्हणणे त्यागी यांनी मांडले आहे. बीसीआयची नियमावली ही राज्यघटनेचे उपच्छेद 14, तसेच कायदेकिषयक शिक्षण घेण्याचे स्वातंत्र्य देणाऱया उपच्छेद 21 चे उल्लंघन करणारी आहे, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे.