सौम्य लक्षणे असणाऱ्य़ांना कोरोना रुग्णालयात बेड नाही

राज्यातील कोरोना रुग्णांचा वाढणारा आकडा लक्षात घेऊन यापुढे सौम्य लक्षणे असणाऱ्य़ा रुग्णांना कोरोना केअर सेंटरमध्ये किंवा घरीच उपचारासाठी ठेवण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतले आहे. अशा रुग्णांना कोरोना रुग्णालयात बेड न देण्याचे आदेशही निर्गमित झाले आहेत.

सौम्य लक्षणे असलेले कोरोना रुग्ण पन्नाशीच्या आतील असतील तसेच मधुमेह, उच्च रक्तदाब असे आजार त्यांना नसतील तर त्यांना घरीच क्वॉरंन्टाइन करावे किंवा कोरोना केअर सेंटरमध्ये दाखल करावे, असे आदेश आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या