
सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोनाचा धुमाकूळ सुरू असून, दिलासादायक घटना म्हणजे, वर्षभरापासून 10 तालुक्यांतील 73 गावांत अद्यापि एकही रुग्ण आढळलेला नाही. ही 73 गावे कोरोनामुक्त आहेत.
सोलापूर शहर व जिल्ह्यात गेल्या वर्षभरापासून कोरोना संसर्गाचा धुमाकूळ सुरू आहे. अनेक गावे कोरोनाने बाधित झाली आहेत. वर्षभरात 11 तालुक्यांत 50 हजारहून अधिक रुग्ण आढळले. ग्रामीण भागात जवळपास 1300 जणांचा मृत्यू झाला आहे. अशा स्थितीत 10 तालुक्यांतील 73 गावे कोरोनापासून दूर राहिली आहेत. जिल्ह्यात जवळपास 1088 गावे असून, 1015 गावांमध्ये आतापर्यंत कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांची सजगता व गावकऱ्यांची सहकार्याची भूमिका यामुळे या 73 गावांत कोरोना अद्यापि पोहोचला नाही.

































































