
सामना प्रतिनिधी । संभाजीनगर
स्थायी समितीच्या बैठकीस उशिरायेणाऱ्या अधिकाऱ्यांना सभागृहात प्रवेश देण्यात येऊ नये, असेआदेश सभापती राजू वैद्य यांनी दिले. त्यामुळे प्रवेश नाकारण्यातआल्याने एकच खळबळ उडाली. अनेक अधिकाऱ्यांना सभागृहाच्याबाहेरच थांबावे लागले. सभागृहाच्या बाजूच्या हॉलमध्ये अधिकारी एका रांगेत शांततेत बसून होते.
महानगरपालिकेच्या स्थायी समितीची बैठक सोमवारी सकाळी ११.३० वाजता आयोजित करण्यात आली होती. अगदी वेळेवर सभापती राजू वैद्य व स्थायी समितीचे काही सदस्य, प्रभारी अतिरिक्त आयुक्त डी. पी. कुलकर्णी, मुख्य लेखाधिकारी रामप्रसादसोळुंके, मालमत्ता अधिकारी वामन कांबळे, विद्युत विभाग प्रमुखके. डी. देशमुख, खमर खान, अग्निशमन अधिकारी आर. के. सुरे हेमोजकेच अधिकारी सभागृहात हजर झाले. बैठकीला वंदे मातरम्ने सुरुवात झाली. वंदे मातरम् संपताच सभापती राजू वैद्य यांनी बैठकीस येणाऱ्या अधिकाऱ्यांना सभागृहात प्रवेश देऊ नये असे आदेश देत सभागृहाचा दरवाजा बंद केला. स्थायी समितीच्या बैठकीलासुरुवात झाल्यानंतर मुख्य लेखा परीक्षक दीपाराणी देवतराज, आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर, कार्यकारी अभियंता सय्यद सिकंदरअली, हेमंत कोल्हे, उपअभियंता फालक, यांच्यासह वॉर्ड अधिकारीउशीराने आले. परंतु या अधिकाऱ्यांना सभागृहात प्रवेश नाकारण्यात आला.
सभापतींनी प्रवेश नाकारल्यामुळे हे अधिकारी बाजूच्या हॉलमध्ये असलेल्या खुर्च्यांवर एका रांगेत शांततेत बसले होते. अधिकारी बैठकीला सभागृहात नसले तरी प्रभारी अतिरिक्त आयुक्त डी. पी. कुलकर्णीयांना सूचना करून बैठकीचे कामकाज केले. या संदर्भात सभापतीराजू वैद्य म्हणाले, मनपातील अधिकाऱ्यांना शिस्त लावण्याचा हा प्रयत्न आहे. अधिकाऱ्यांनी वेळेवर कार्यालयात हजर झालेच पाहिजे. पहिलीवेळ असल्यामुळे अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई केली जाणारनाही, त्यांना योग्य समज दिली जाईल.































































