
गेल्या वर्षी कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन जारी करण्यात आला होता. तेव्हा रेल्वे सेवाही बंद करण्यात आली होती. नंतर कोरोना संकट कमी झाल्यानंतर अनलॉक प्रक्रियेअंतर्गत रेल्वेसेवा सुरू करण्यात आली होती. आता कोरोनाचे संकट वाढलेले असताना रेल्वे पुना बंद करणार का असा प्रश्न विचारण्यात येत आहे. तसेच लॉकडाऊनच्या भितीने अनेक मजुरांनी आपल्या घरचा रस्ता धरून रेल्वे स्थानकांवर गर्दी केली आहे. अशा वेळी रेल्वे सेवा बंद होणार की नाही यावर रेल्वे प्रशासनाने स्पष्टीकरण दिले आहे.
रेल्वे सेवा बंद करण्याचा कुठलाही निर्णय नाही असे रेल्वेने स्पष्ट केले आहे. तसेच महाराष्ट्रात मजुर पलायन करत नसून ते रेल्वेचे सामान्य प्रवासी आहेत. नाईट कर्फ्यूपासून वाचण्यासाठी हे प्रवासी लवकर स्थानक गाठत आहेत असे रेल्वेने म्हटले आहे.




























































