देशाच्या अर्थव्यवस्थेवर उपस्थित केले प्रश्न, किम जोंगने पाच अधिकाऱयांना गोळय़ा घातल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उनने पुन्हा एकदा आपले क्रौर्य दाखवले आहे. किमने देशाच्या अर्थव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करणाऱया मंत्रालयातील पाच अधिकाऱयांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. हुकूमशाहच्या आदेशाने ‘त्या’ पाचही अधिकाऱयांना गोळ्या घालण्यात आल्या.

उत्तर कोरियातील घडामोडींवर नजर ठेवणाऱया दक्षिण कोरियातील साइट डेली एनवेने दिलेल्या माहितीनुसार, अर्थ मंत्रालयातील या पाच अधिकाऱयांनी डिनर पार्टीमध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेवर चर्चा केली होती. यादरम्यान त्यांनी किमच्या निर्णयांची निंदा केली होती.  या चर्चेची माहिती किम जोंगला कोणीतरी दिली. त्यानंतर किमने त्यांच्याकडून कबुल करुन घेतले की, त्यांनी देशाला कमजोर करण्याचे कृत्य केले आहे. त्यानंतर 30 जुलै रोजी त्या सर्व अधिकाऱयांना गोळ्या मारल्या.याआधी देशात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी चीनमधून येणाऱया लोकांना गोळी घालण्याचे आदेश किम जोंगने दिले होते.

काकाला शिकारी कुत्र्यांसमोर फेकले

सत्तेवर आपली पकड मजबूत करण्यासाठी किम जोंगने त्याचे काका किम जोंग थाएक यांना 120 उपाशी कुत्र्यांना खायला दिले होते. चिनी वृत्तपत्र ‘केन कई पो’ ने दावा केला होता की, शिक्षेदरम्यान किम जोंगसह 300 अधिकारी उपस्थित होते. या सर्वांसमोर 67  वर्षीय थाएकला शिकारी कुत्र्यांसमोर फेकले होते. थाएकच्या मृत्यूवर प्रश्न उपस्थित करणाऱया थाएकाच्या पत्नीलाही विष देऊन मारले होते.