मोठी बातमी! जुने पासपोर्ट रद्द होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन ।  नवी दिल्ली

 परदेश प्रवासासाठी अनिवार्य असलेले पासपोर्ट आता ‘चिप’च्या स्वरूपात प्रवाशांना लवकरच मिळणार आहेत. यामुळे जुने पासपोर्ट रद्द होणार आहेत. बनावट पासपोर्टच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने हे पाऊल उचलले आहे. ई पासपोर्टच्या निर्मितीला सरकारने मंजुरी दिली आहे असे परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांनी सांगितले. नवीन पासपोर्टमध्ये सुरक्षेसाठी एक चिप बसवण्यात आली आहे. ई पासपोर्टमधील चिपमध्ये संबंधित नागरिकाची संपूर्ण माहिती, त्याचा बायोमेट्रिक डेटा, डिजिटल स्वाक्षरी आदी असणार आहे. या चिपच्या पासपोर्टमध्ये फेरफार करण्याचा प्रयत्न कोणी केला तर विमानतळावरील यंत्रणेला त्याची माहिती मिळणार आहे.