विठुमाऊलीच्या ऑनलाइन दर्शनासाठी आता 100 रुपये

34

सामना प्रतिनिधी । पंढरपूर

श्री विठ्ठल-रुक्मिणीचे ऑनलाइन दर्शन हवे असेल तर यापुढे 100 रुपये मोजावे लागतील. आजवर ही सुविधा मोफत होती या नव्या देणगी आकारणीमुळे मंदिर समितीला वर्षाकाठी 15 कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे.

हभप औसेकर महाराज यांच्या अध्यक्षतेखाली आज मंदिर समितीची बैठक पार पडली. या बैठकीत औसेकर महाराज यांनी ऑनलाइन दर्शन व्यवस्थेला 100 रुपये आकारणी करावी असा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला सर्वांनी संमती दिली, वर्षाकाठी 14 ते 15 लाख भाविक ऑनलाइन दर्शनाचा लाभ घेतात.

आपली प्रतिक्रिया द्या