आयडियल स्टडी ऍपच्या माध्यमातून नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन; शिवसेनेचा अभिनव उपक्रम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी आणि परीक्षेनंतरही उज्ज्वल भविष्याचा मार्ग दाखवण्यासाठी आयडियल स्टडी अॅपच्या माध्यमातून नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना परळ येथील एम.डी. महाविद्यालयात करीअर मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी शिवसेना शाखा 204 च्यावतीने 200 विद्यार्थ्यांना 1100 रुपयांचे आयडियल स्टडी अॅप मोफत इन्स्टॉल करून देण्यात आले.

खासदार अरविंद सावंत आणि आमदार अजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली  नववी आणि दहावीच्या विध्यार्थ्यांना परीक्षेसाठी आणि परीक्षेनंतरही उज्ज्वल भविष्याचा मार्ग दाखवण्यासाठी आयडिअल स्टडी अॅपच्या माध्यमातून शाखा क्र.204 च्या वतीने करीअर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी 200 विद्यार्थ्यांच्या मोबाईलमध्ये आयडियल स्टडी अॅप मोफत इन्स्टॉल करून देण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार दगडूदादा सकपाळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक अनिल कोकीळ, सुधीर साळवी, पराग चव्हाण, शाखाप्रमुख किरण तावडे, शाखा संघटक कांचन घाणेकर, सुजय गुरव, मितेश साटम, लता रहाटे, रूपाली चांदे, वैभवी चव्हाण, दिव्या घाडीगावकर, भारती पेडणेकर, वंदना शिंदे, समीक्षा परळकर, सीमा संसारे, सुप्रीत म्हात्रे, शार्दुल महाडगुत, श्रुती पोटले, ओमकार धुरी, पदाधिकारी शिवसैनिक, युवासैनिक उपस्थित होते.