आरपीएफच्या दहा हजार पदांसाठी 95 लाख 51 हजार अर्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

देशभरातील बेरोजगारीचे प्रमाण इतके मोठे आहे की रेल्वे सुरक्षा बलासाठी देशस्तरावर आरपीएफमध्ये अधिकारी, कॉन्स्टेबल स्तरावर दहा हजार पदे आहेत. पण त्यासाठी आलेल्या अर्जांची संख्या मती गुंग करणारी आहे. या दोन्ही पदांसाठी मिळून तब्बल 95 लाख अर्ज आले आहेत.

या अर्जांतून चाळणी करून या उमेदवारांची परीक्षा घेण्याचे मोठे आव्हान आरपीएफसमोर उभे राहिले असून त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार असल्याचे आरपीएफचे महासंचालक अरुण कुमार यांनी सांगितले. देशभरात आरपीएफमध्ये 8,619 कॉन्स्टेबल पदासाठी 76 लाख 60 हजार अर्ज आले आहेत, तर 1,120 पोलीस उपनिरीक्षक पदांसाठी आतापर्यंत 95 लाख 51 हजार अर्ज प्राप्त झाले आहेत.