पंतप्रधान आताही ‘नमस्ते ट्रम्प’ करतील का? चिदंबरम यांचा मोदींना सवाल

हिंदुस्थानात कोरोना संसर्गासोबतच राजकीय आरोप-प्रत्यारोपातही वाढ होताना दिसत आहे. अशातच काँग्रेस नेते माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी गुरुवारी मोदींना चिमटा काढत, आपल्या प्रिय मित्राचा सन्मान करण्यासाठी आणखी एक ‘नमस्ते ट्रम्प रॅलीचे आयोजन करणार?, असा सवाल केला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन, रशियाबरोबरच हिंदुस्थानावरही कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा लपवल्याचा आरोप केला आहे. यावरच चिदंबरम यांनी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

चिदंबरम यांनी ट्विटमध्ये लिहलं आहे की, “डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन आणि रशियाबरोबरच हिंदुस्थानावरही कोरोनामुळे होत असलेल्या मृत्यूंची आकडेवारी लपवल्याचा आरोप केला आहे. ट्रम्प यांनी तीनही देशांवर सर्वाधिक हवा प्रदूषण करण्याचा आरोपही केला. मोदी आपल्या मित्राला सन्मानित करण्यासाठी आणखी एक ‘नमस्ते ट्रम्प’ रॅलीचे आयोजन करणार का?, असं ते म्हणाले आहेत.

यासोबतच दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिलं आहे की, ‘ट्रम्प राष्ट्राध्यक्षपदाच्या डिबेटमध्ये म्हणाले, तुम्ही 47 वर्षांत जे केले नाही त्यापेक्षा अधिक मी 47 महिन्यांत केले आहे. जर या वक्तव्यातून तुम्हाला हिंदुस्थानात कुणाची आठवण येत असेल तर, ती तुमची कल्पना आहे.’

ट्रम्प काय म्हणाले.. वाचा..

हिंदुस्थानने कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या लपवली; डोनाल्ड ट्रम्प यांचा आरोप

आपली प्रतिक्रिया द्या