पदवीदान समारंभातील पगडी वाद निरर्थक – आमदार स्‍नेहलता कोल्‍हे  

66

सामना प्रतिनिधी । कोपरगांव 

राजमाता जिजाउ यांनी शिवबाला घडविले त्यांच्याकरवी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकारले. बलाढय अदिलशाहीविरूध्द धडका देऊन स्वराज्याचा मान सन्मान राखला, तर विवेकानंदानी माणसातील माणूसपण जागविणारे शिक्षण स्वामी विवेकानंद यांनी दिले. नवभारत उभारणीसाठी त्यांनी शिक्षणांतुन संजीवनी निर्माण केली त्या स्वामी विवेकानंदांचे विचार आजच्या तरूणांसाठी  मार्गदर्शक आहेत. मात्र सध्या पुण्यात  विद्यापीठ पदवीदान समारंभातील सुरू असलेला पगडी वाद निरर्थक असल्‍याचा आमदार  स्‍नेहलता कोल्‍हे  यांनी सांगितले. कोपरगाव  शहर व तालुका भाजपा महिला आघाडीच्या राजमाता जिजाऊ व स्‍वामी विवेकानंद यांनी जयंती कार्यक्रमात अभिवादन करताना त्यांनी हे वक्त्यव्य केले.

स्‍नेहलता कोल्‍हे म्‍हणाल्‍या,  “जिजाऊंनी  स्त्रियांना सन्मान आणि अन्यायींना कठोर शिक्षा देऊन महिला ही शारिरीक, मानसिक आणि बौध्दीकदृष्टया सक्षम असल्याचे सार्‍या जगाला दाखवून दिले आहे. विज्ञान युगात संत पुरूषांचे विचार समाजाच्या उत्कर्षासाठीच असतात.”  घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, राजर्षी शाहु महाराज, कर्मवीर भाउराव पाटील यांची वंचित घटकासाठी कार्यप्रणाली प्रत्येकांने अंगीकारली पाहिजे असेही त्‍यांनी सांगीतले.

तालुकाध्यक्षा योगिता किरण होन यांनी प्रास्तविक केले. शिल्पा रोहमारे यांनी राजमाता जिजाउंच्या कार्याचा परिचय करून दिला.  सौ. रेणुका विवेक कोल्हे यांच्या हस्ते राजमाता व स्वामी विवेकानंद प्रतिमेचे पुजन करण्यांत आले.

याप्रसंगी गटनेते रविंद्र पाठक, शहराध्यक्ष कैलास खैरे, तालुका क्रीडा संकुलाचे सचिव राजेंद्र पाटणकर, नगरसेविका मंगल आढाव, विद्या सोनवणे गोरक्ष भजनी मंडळाच्या महिला, बचतगट संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या