पीएसएलमुळे पीसीबीला नुकसानच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयपीएलच्या धर्तीवर पाकिस्तानातही पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) सुरू करण्यात आली. मात्र पीसीएल पाचव्या मोसमापासून तोटय़ात जाऊ लागल्यामुळे याचा फटका पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला बसू लागला आहे. पीसीएलची मुहूर्तभेट रोवताना फ्रेंचायझी आणि पीसीबी यांच्यात असलेल्या आर्थिक मॉडेलमुळे पीसीबीलाच प्रचंड तोटा होत असल्याचे लेखा अहवालात समोर आले आहे. या अहवालात पीसीबीने केवळ पीएसएलचे सारे काही ठीक असल्याचे केवळ चित्र रंगवले आहे, पण प्रत्यक्षात असे काही नसल्याचे लेखा अहवालाने स्पष्ट म्हटले आहे. पीएसएलमुळे फ्रेंचायझी फायद्यात आहे, पण पीसीबीला सातपासून बाराव्या मोसमापर्यंत 1075 कोटी रुपयांचे प्रचंड आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे. हे नुकसान कमी करण्यासाठी पीएसएलबाबत फ्रेंचायझी आणि पीसीबी यांच्यात केलेल्या आर्थिक मॉडेलमध्ये फेररचना करणे महत्त्वाचे आहे, मात्र करारानुसार 2025 पर्यंत यात कोणताही बदल करता येणार नाही.