पाकिस्तानचा तिसर्‍याच दिवशी खेळ खल्लास,  द. आफ्रिकेचा सहा गडी राखून विजय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । सेंच्युरीयन 

तेज गोलंदाज ड्वेन ओलिव्हीएरच्या (11 बळी) प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकन क्रिकेट संघाने येथे झालेल्या पहिल्या कसोटीत पाकिस्तानला सहा गडी राखून धूळ चारत तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. पाकिस्तानचा खेळ तीन दिवसांतच खल्लास झाला हे विशेष.

पाकिस्तानकडून मिळालेल्या 149 धावांचा पाठलाग करणार्‍या दक्षिण आफ्रिकेने चार गडी गमावत विजयी लक्ष्य ओलांडले. डीन एल्गारने दहा चौकारांसह 50 धावांची खेळी साकारली. हाशीम अमलाने 11 चौकारांसह नाबाद 63 धावा फटकावल्या. एडम मार्कराम (0), थ्युनिस डी ब्रुएन (10 धावा), फाफ डय़ुप्लेसिस (0) यांना निराशेला सामोरे जावे लागले. तेम्बा बवुमाने नाबाद 13 धावा केल्या.