देवदूतांवर काळाचा घाला, अपघातग्रस्तांना मदतीसाठी गेलेल्या दोन तरुणांचा अपघातात मृत्यू

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर किलोमीटर सकाळी 8 च्या दरम्यान मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या स्विफ्ट टॅक्सीला कंटेंनरने मागून धडक दिली. त्याच दरम्यान तेथे पनवेल रुग्णवाहिका असोसिएशनचे अध्यक्ष सुशांत मोहिते वय (26) व पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक तेजस कांडपिले व  इतर 2 जण त्या अपघातात मदत करण्यासाठी आपली मर्सिडीज  गाडी घेऊन थांबले असताना अचानक मागून आलेल्या आयशर टेम्पोने  मर्सिडीजला धडक दिली.

या धडकेत पनवेल रुग्णवाहिका असोसिएशनचे अध्यक्ष सुशांत मोहिते आणि  आणि प्रथमेश बहिरा (24) यांचा मृत्यू झाला. या अपघातात हर्षद खुदकर हे जखमी झाले असून त्यांना एमजीएम रुग्णालयात  दाखल करण्यात आले आहे. पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक तेजस कांडपिले या अपघातात बचावले असून ते सुखरूप आहेत. या अपघातातील इतर जखमींना पनवेलच्या अष्टविनायक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या