
सामना प्रतिनिधी। गंगाखेड
येथील राणीसावरगाव रोड दत्तमंदिर परिसरात सप्ताहाचे कार्यक्रम सुरू असताना गंगाखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोहन माछरे आणि त्यांचे सहकाऱ्यांनी धुडगूस घालत कार्यक्रम बंद करण्याची धमकी दिली. या घटनेचा निषेध म्हणून आज शेकडो वारकऱ्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी माछरे यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी करणारे निवेदन तहसिलदारांना देण्यात दिले.
येथील राणीसावरगाव रोड दत्तमंदिर परिसरातील भगवनान महाराज सातपुते इसादकर यांनी आठ दिवस सप्ताह, कथा, ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन केले होते. 24 ते 30 जानेवारीपर्यंत हा सप्ताह साजरा होणार आहे. पण सप्ताहाच्या दुसऱ्याच दिवशी 25 जानेवारी रात्री 9.30 वाजता दरम्यान ह.भ.प. गिरगावकर यांचे किर्तन चालू असतांनाच गंगाखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोहन माछरे व इतर चार कर्मचारी सप्ताहास्थळी येऊन सप्ताह बंद करा, रात्रीची वेळ झाली. नाहीतर तुमच्यावर महाराजांवर गुन्हे दाखल करू. अशी धमकी देत माछरे यांनी सप्ताहात धुडघुस घालुन सप्ताह बंद पाडला. याच्या निषेधार्थ ग़गाखेडात आज सकाळी 11 वाजता संतजनाबाई मंदिरापासून मेनरोड मार्ग शांततेत मार्चा काढून तहसीलदार यांना निवेदन दिले. या मोर्चात हजारो महाराज, नागरीकासह खासदार व सर्वपक्षीय नेते सामिल झाले होते.
गंगाखेडात नव्हे तर मराठवाड्यात संत मोतीराम महाराज, संत मारोतराव महाराज यांच्या किर्तनाची परंपरा गेल्या 50 ते साठ वर्षापासून चालू आहे. शहरात संत मोतीराम महाराज शिक्षणसंस्था व गुरुवर्य मारोतराव महाराज भगवान महाराज सातपुते इसादर यांच्या संस्थेच्या प्रारंगात 24 ते 30 जानेवारीपर्यंत सप्ताह, कथा, ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, किर्तनाच्या दुसऱ्याच दिवशी 25 रोजी ह.भ.प. बाळू महाराज गिरगावकर यांचे किर्तन सुरू असतांना रात्री 9.30 वा.दरम्यान गंगाखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोहन माछरे व इतर चार कर्मच्याऱ्यांनी कार्यक्रम बंद करा, नसता तुमच्यावर गुन्हे दाखल करुन सामान जप्त करु तुम्हाला परवानगी दिली कोणी अशी धमकी देऊन मद्यधुंद अवस्थेत येऊन धुडगुस घालुन सप्ताह बंद पाडला. महाराजांसोबत हुज्जत घातली. या कारणावरुन पोलीस निरीक्षक सोहन माछरे यांच्यासह चार पोलीस कर्मच्याऱ्यांवर कारवाई करुन निलंबीत करण्यात यावेत या मागणीसाठी संत जनाबाई मंदिरपासून मेनरोड मार्ग हजारो वारकऱ्यासह महाराज सर्व राजकीय पक्षातील कार्यकर्ते व महिला या मोर्चात सामील झाले होते, तहसीलवर मोर्चा धडकताच तहसीलदार यांना निवेदन दिले. यानंतर अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करीत पोलीस निरीक्षक यांच्यासह चार पोलीस कर्मच्याऱ्यावर कारवाई करुन निलंबीत करण्यात यावे अथवा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला. या मोर्चास सर्व राजकीय पक्षांनी पाठींबा दिला होता तर सर्व पक्षाचे नेते मोर्चात सामील झाले होते हजारो वारकरी, महाराज मंडळी, नागरीक सामील झाले होते.
यावेळी खासदार संजय जाधव म्हणाले, आजपर्यंत सप्ताहात कधी अशी घटना घडली नसून घडलेल्या घटनेचा निषेध करूं मी या मार्चात खासदार म्हणून आलो नाही तर वारकरी म्हणुन आलो आहे. न्यायालय डान्स बारला परवनगी रात्रभर देतो. उरुसात रात्रभर गाणे सुरू असतात. अवैध धंद्यास दिवसरात्र परवानगी असते. त्यांचे हाप्ते येतात ना, सप्ताहात वाईट व्यसने दुर व्हावेत. सामाजिक कामे तालुक्यात वारकरी करतात. त्यास विरोध पोलीस करुन मद्यधुंद अवस्थेत धिंगाना घालूनं सप्ताह बंद पाडतात. गंगाखेड ही संत जनाबाईची जन्मभूमी असून या ठिकाणी संत मंडळी, वारकऱ्यांची संख्या आहे. कायद्याचे पालन समितीने करावेत येथील वारकरी समाजाच्या हिताचे काम करतात. पोलीस निरीक्षक माछरे यांना निलंबीत नाही तर डिस्मीस करावेत या घडलेल्या घटना निंदनीय असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून मी व वारकरी संस्थेच्या वतीने निवेदन देऊन डिस्मीस करु असेही खासदार यांनी मनोगतातुन व्यक्त केले.
सप्ताहात घडलेली घटना निंदनीय असून या घटंनेचा निषेध करुन जो सप्ताहात घडलेल्या प्रकाराची पोलीस निरीक्षक सोहन माछरे यांना वारकऱ्यांनी विनंती केली होती. परंतु माछरे हे मंद्यधुंद अवस्थेत येऊन धिंगाना घातला अन सप्ताह बंद केला. करणे योग्य नाही, तरी माछरे न ऐकता बंद पाढला, आमच्यावर गुन्हे दाखल करुं धमकी दिली होती. पोलीस निरीक्षक माछरे यांना निलंबीत करावेत, यासाठी परभणी, पालम व पूर्णा येथेही मोर्च काढून मागणी करणार आहोत. आमचा देह गेला तरी चालतील, परंतु माछरे हा निलंबीत झाला पाहिजे.असे सभापती बालासाहेब निरस यांनी म्हटले आहे.

































































