74 कोटींचा फ्लॉवर पॉट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पॅरिसमधील ओसेनॅट ऑक्शन हाऊसतर्फे नुकताच एका चिनी फ्लॉवर पॉटचा लिलाव करण्यात आला आहे. लिलावात या फ्लॉवर पॉटची किंमत 1900 डॉलर म्हणजेच सुमारे दीड लाख रुपये ठेवण्यात आली होती. परंतु, हा फ्लॉवर प्लॉट खरेदी करण्यासाठी ग्राहकांच्या उडय़ा पडल्या आणि दीड लाख रुपयांना विक्रीसाठी ठेवलेल्या या फ्लॉवर पॉट तब्बल 74 कोटी रुपयांना विकला गेला आहे.

 निळय़ा आणि पांढऱया रंगाच्या टिआनक्युपिंग फ्लॉवर पॉट उपस्थितांना ऐतिहासिक वाटला आणि उपस्थितांनी  त्यासाठी विक्रमी बोली लावायला सुरूवात केली. बघता बघता या फ्लॉवर पॉटसाठी मूळ किमतीपेक्षा सुमारे 4 हजार पट बोली लागली. गंमत म्हणजे, हा फ्लॉवर फार जुना नसून केवळ 30 वर्षांपूर्वीचा आहे. त्यामुळे ज्याने हा फ्लॉवर पॉट विक्रीसाठी ठेवला त्याचे नशीबच उजळले आहे. ऑक्शन हाऊसच्या अधिकाऱयाने दिलेल्या माहितीनुसार, या फ्लॉवर पॉटचे मालक परदेशात राहतात. ते त्यांच्या दिवंगत