मासिक पाळीच्यावेळी होणाऱ्या त्रासातून मुक्ती मिळवण्यासाठी करा हे सोप्पे उपाय

दर महिन्याला येणारी मासिक पाळी अनेक महिलांना त्रासदायक ठरते. पोटात दुखणे, कंबरदुखी, मळमळणं असे त्रास या दिवसात होत असतात. त्यामुळे मासिक पाळीच्या काळात महिला खूप त्रासलेल्या दिसतात तसेच त्यांची मानसिक स्थितीही ठिक नसते. म्हणूनच आज आम्ही काही सोप्पे उपाय तुम्हाला सांगत आहोत.

vilamb-yoga

सोप्पे व्यायाम करा – मासिक पाळीच्या वेळी काही सोप्पे व्यायाम करा. त्यामुळे शरीरात एंडोर्फिन हार्मो तयार होते व त्यामुळे मूड चांगला होतो. व्यायामा ऐवजी योगा केला तरी फायदा होईल

hot-water-bag-1

हीट थेरपी – पोटदुखत असल्यास पोटाला गरम पाण्याची बॅग किंवा हिंटींग पॅडने शेक दिला तर आराम मिळतो. अनेकांना शेक दिल्याने फायदा झाल्याचे समोर आले आहे.

drink-water

भरपूर पाणी पिणे – मासिक पाळीत भरपूर पाणी पिणे फायदेशीर ठरते. तसेच हिरव्या भाज्या व कलिंगडासारखी पाणीदार फळं खावीत.

massage-lady

मसाज थेरपी – तेलाने पोटावर व पाठीवर मसाच करा. मसाज केल्याने शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत होतो. शरीरावरील त्राण कमी होऊन मू़ड देखील सुधारतो. व पोटदुखी कंबरदुखी कमी होते.

आपली प्रतिक्रिया द्या