त्यांना काही झाले तर ती देशासाठी शरमेची बाब ठरेल, सोनम वांगचूक यांचे उपोषण सोडवण्यासाठी न्यायालयात याचिका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

NEET पेपरफुटी व परिक्षांमधील भ्रष्टाचाराविरोधात लडाखचे पर्यावरणवादी कार्यकर्ते, शिक्षणतज्ञ सोनम वांगचुक हे गेल्या 18 दिवसांपासून दिल्लीतील जंतरमंतर येथे उपोषणाला बसले आहेत. उपोषणामुळे त्यांचे तब्बल साडे आठ किलो वजन कमी झाले आहे. त्यांचे हे उपोषण सोडवण्यासाठी दिल्लीच्या उच्च न्यायालयात एका कार्यकर्त्याने याचिका दाखल केली आहे. ”जर यापुढे वांगचुक यांचे उपोषण सुरुच राहिले तर दोन दिवसात त्यांच्या जीवाचं बरंवाईट होऊ शकतं”, असं या याचिकेत म्हटलं आहे.

दिल्लीतील सामाजिक कार्यकर्ता व वकील असलेल्या राकेश कुमार सैनी यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करत केंद्र सरकार व दिल्ली उच्च न्यायालयाने वांगचुक यांना उपोषण सोडायला लावावे व त्यांना वैद्यकीय उपचार द्यावे अशी मागणी केली आहे.

”सरकारने त्यांना उपोषण सोडायला लावले पाहिजे. त्यांना रुग्णालयात नेऊन नळीद्वारे त्यांना गरजेची जीवनसत्त्वे द्यायला हवीत. जर त्यांना काही झाले तर ती देशासाठी व जगासाठी अत्यंत शरमेची बाब असेल”, असे या याचिकेत म्हटले आहे.