
कोलकाताचा अभिषेक व गुरुग्रामचा चैतन्य यांनी रविवारी कोलकात्यात पारंपारिक पद्धतीने लग्न केले आहे. अभिषेक व चैतन्य हे गेल्या तीन वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते.

मेहेंदी, हळद व नंतर पारंपारिक बंगाली पद्धतीने त्यांनी सप्तपदी घेतल्या. यावेळी त्यांचे संपूर्ण कुंटुंब देखील होते.

अभिषेक व चैतन्य यांची तीन वर्षांपूर्वी फेसबुकवर ओळख झाली होती. त्यानंतर एकमेकांशी ते व्हॉट्सअॅवर बोलत होते. अखेर लॉकडाऊन संपल्यावर ते एकमेकांना भेटले. तिथून त्यांच्या प्रेमकहानीला सुरुवात झाली.

चैतन्य व अभिषेक यांनी पारंपारिक पद्धतीने लग्न केले असले तरी हिंदुस्थानात अद्याप कायद्याने समलैंगिक लग्नाला मान्यता नसल्याने त्यांचे लग्न अधिकृतरित्या नोंद करता आलेले नाही.





























































