
काही दिवसांपूर्वी दिल्लीतील यमुना नदीतील प्रदुषणाचा फोटो व्हायरल झाला होता. देशातील महत्त्वाची नदी एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रदूषित असल्याचे पाहून सर्वांना धक्काच बसला. मात्र आपल्या हिंदुस्थानात एक अशी नदी देखील आहे जिचे पाणी अगदी आरश्यासारखे पारदर्शक आहे. या नदीचे फोटो पाहून कुणालाच विश्वास बसत नाही की ही नदी हिंदुस्थानात आहे.

हिंदुस्थानातील मेघालय राज्यात ही नदी असून उमंगोट असे त्या नदीचे नाव आहे. शिलाँगपासून 100 किमी अंतरावर ही नदी आहे. या नदीचे पाणी फारच स्वच्छ व आरशासारखे पारदर्शी आहे.

आज जल शक्ती मंत्रालयाने या नदीचा फोटो त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे.
































































