
आयपीएलचा माजी अध्यक्ष ललित मोदी याने तो सुष्मिता सेनला डेट करत असल्याचे नुकतेच जाहीर केले आहे. सुष्मिता व ललित हे चार दिवसांसाठी फिरायला मालदिवला गेले होते. तेथील त्यांचे काही फोटो ललितने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत.

सुष्मिताने देखील मालदीवचे तिच्या एकटीचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले होते. अद्याप सुष्मिताने या नात्याबाबत अधिकृत प्रतिक्रीया दिलेली नाही.




























































