बाजारात आले पिझ्झा आईस्क्रीम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कडक उन्हाळा सुरू झाला असून, अनेक जण उन्हाळ्यापासून तात्पुरता दिलासा मिळवण्यासाठी थंडगार आईस्क्रीम खाणं पसंत करतात. यामुळे उन्हाळ्यामध्ये आईस्क्रीमला जास्त मागणी असते. हे ओळखून आईस्क्रीम कंपन्या नवनवे फ्लेवर्स बाजारात आणत असतात. बास्कीन रॉबिन्सनेही नव्या गोडीची आईस्क्रीम बाजारात उतरवली आहेत. यातलं सगळ्यात वेगळं आईसस्क्रीम आहे ते म्हणजे पिझ्झा आईस्क्रीम. हे पिझ्झासारखे गोलाकार आईस्क्रीम असून ते ग्राहकांच्या पसंतीस पडेल असा विश्वास बास्कीन रॉबिन्सने व्यक्त केला आहे. रिफ्रेशिंग आईस्क्रीम फ्लोट्स ,फ्रूट क्रीम संडे आणि मरमेड संडे व युनिकॉर्न संडे असे आणखी काही नवे फ्लेवर्स बास्कीन रॉबिन्सने बाजारात आणले आहेत. स्वीगी, झोमाटो ,बिग बास्केटवरही बास्कीन रॉबिन्सची आईस्क्रीम उपलब्ध आहेत. “ग्राहकांनी याआधी पाहिली नसतील अशी आईस्क्रीम आणम्यावर आमचा भर आहे. आमचे नवीन समर कलेक्शन सादर करताना आम्हाला खूप आनंद होत आहे ” असे बास्किन रॉबिन्स चे मुख्य कार्यकारी अधिकारी मोहित खट्टर म्हणाले